भर उन्हात डोयावर गुंड घेऊन एक किमीची पायपीट
तळेगाव (श्या.पं.),
Water Supply in Moi Tanda Villageउन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना आष्टी तालुयातील मोई तांडा येथील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. गावातील विहिरी व पाण्याचे इतर स्त्रोत आटल्याने महिला, वृद्ध व लहान मुलांना शेतशिवारातून तब्बल एक किलोमीटर पायी चालत डोयावर पाण्याचे हंडे आणावे लागत आहेत.
Water Supply in Moi Tanda Village मोई तांडा गावात सुसुंद्रा तलावातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, पाणी पुरवठा करणारी विहीर ही तलावात असल्यामुळे त्यातून येणारे पाणी गढूळ येत असून पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पोहोचते. टाकी स्वच्छ केल्यावर सुद्धा पाणी गढूळ येत आहे. गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहे. पहाटेपासूनच महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरू होते. एक गुंड पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. गावकर्यांनी अनेक वेळा यासंबंधी प्रशासनाकडे निवेदन दिल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यत होत आहे. पाणी समस्या न सुटल्यास गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
ट्रँकरने करा पाणी पुरवठा
मोई तांडा गावाला तातडीने टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा व कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रापंने बोरवेल ताब्यात घेऊन गावात पाणी उपलब्ध केले. मात्र, तेही काही दिवसात कोरडा पडला. एक किलोमीटर अंतरावर एक बोरवेल असून ते ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच सुषमा चव्हाण यांनी सांगितले.