​'ट्रॉफी चोर' मोहसिन नक्वी IPL फायनलला येणार?

    दिनांक :17-May-2026
Total Views |
अहमदाबाद,
Will Trophy Thief Mohsin Naqvi आशिया चषकादरम्यान ट्रॉफी प्रकरणावरून वादाच्या केंद्रस्थानी आलेले पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना आता अहमदाबाद येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ते आयपीएल २०२६ चा अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
Will Trophy Thief Mohsin Naqvi
 
या प्रकरणाची पार्श्वभूमी आशिया चषक स्पर्धेशी जोडलेली असून, त्या वेळी भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याचे आणि नंतर ट्रॉफी हस्तांतरावरून निर्माण झालेल्या वादामुळे वातावरण तापले होते. Will Trophy Thief Mohsin Naqvi त्या घटनेनंतर संबंधित ट्रॉफी पाकिस्तानच्या बाजूने नेण्यात आल्याची चर्चा झाली होती, ज्यामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मोहसिन नक्वी यांचे नाव चर्चेत आले आहे.
 
आगामी आयपीएल २०२६ चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर नियोजित आहे. यापूर्वी हा सामना बंगळूर येथे होणार असल्याची चर्चा होती, मात्र तिकीट वाटपाच्या वादातून आणि आर्थिक कारणांमुळे तो बदलून अहमदाबाद येथे हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. Will Trophy Thief Mohsin Naqvi स्पर्धेचे अंतिम टप्पे धर्मशाळा आणि इतर काही ठिकाणीही आयोजित केले जाणार आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची नियोजित बैठकही अहमदाबाद येथे होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी सर्व सदस्यांना निमंत्रण पाठवण्यात आले असून, त्यामध्ये मोहसिन नक्वी यांचाही समावेश आहे. त्यामुळे बैठकीच्या निमित्ताने ते भारतात येतील का, याबाबत अनिश्चितता आहे. सध्याच्या भारत–पाकिस्तान संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत शंका व्यक्त केली जात असून, ते आभासी माध्यमातून सहभागी होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.