तृप्ती देसाई यांचे प्रतिपादन
श्रीक्षेत्र माहूर,
Women's Empowerment माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास, धोंड्याच्या महिन्यानिमित्त आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत साईनाथ वसमतकर यांच्या पुढाकारातून दरवर्षी अन्नदान होते. यावर्षी धोंडे जेवण महाअन्नदान महापंगत चूलबंद कार्यक्रमाचे 17 मे ते 15 जूनपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तृप्ती देसाई यांनी उपस्थिती लावत चूलबंद महाअन्नदान महापंगतीची सुरुवात केली. यावेळी त्यांनी साईनाथ महाराजांच्या सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणाच्या राज्यभर व्यापलेल्या कार्याचे कौतुक करून साईनाथ महाराजांचे अभिनंदन केले.
Women's Empowerment आनंद दत्तधाम आश्रम तथा उपस्थित मान्यवरांच्या वतीने तृप्ती देसाई यांचा सत्कार करण्यात आला. भूमाता फाऊंडेशन ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी साईनाथ महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून लुटारू भोंदूबाबांच्या युगात साईनाथ महाराजांसारखे युगपुरुष निर्माण होणे कठीण असून त्यांचे कार्य उत्तरोत्तर प्रगती करो, अशी भगवंत चरणी प्रार्थना ही केली. यावेळी सनदी अधिकारी प्रशांत राठोड, उबाठा शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, नगर पंचायत अध्यक्ष फिरोज दोसानी, कैलास गोरठेकर, नाना गोरठेकर, नंदकुमार संतान, जवाहरलाल जयस्वाल, विजय आमले, नंदकुमार जोशी, अनिल वाघमारे, दीपक काण्णव, भाऊराव हडसनीकर, रमेश बद्दीवार, अनिल कोरटकर, प्रल्हाद देवडे, वसंत कपाटे, आशीर्वाद पाटील, इलियास बावाणी, दिगंबर जोशी, संजय घोगरे, पुंडलिक हुंबे, सीताराम पाटील, जयकुमार अडकिने, गोपाळ खापर्डे, विनोद भारती, अभिषेक जयस्वाल, माधव वटपलवार, रुद्रवाड, राम दातीर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार शेषराव पाटील यांनी केले. चूलबंद धोंडे जेवणाच्या कार्यक्रमास भाविकांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.