दहावी-बारावी पुरवणी परीक्षा जूनमध्ये

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
10th-12th-supplementary-exams : महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षा नेहमीपेक्षा 15 दिवस आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
KM
 
त्यानुसार दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षांना 16 जूनला सुरुवात होणार आहे. जुलैतच निकाल जाहीर करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षांचे वेळापत्रक यंदा आगाऊ केले होते. त्याच धर्तीवर आता पुरवणी परीक्षांचेही वेळापत्रक पुढे आणले आहे.
 
 
राज्य मंडळाच्या या निर्णयामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 16 जून ते 8 जुलैदरम्यान होणार असून त्याच कालावधीत प्रात्यक्षिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.