नागपूर,
Character Building Camp कर्मश्री दुर्गादासजी रक्षक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तथा ज्ञानेश्वर रक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सु-संस्कार शिबिराचे आयोजन श्रीगुरुदेव मानव मंदिर, येरला, जि. नागपूर येथे करण्यात आले होते. या शिबिरात मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना आजच्या काळात आवश्यक असलेल्या विविध विषयांवर मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देण्यात आले. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर राहून स्वावलंबी आणि शिस्तबद्ध जीवन कसे जगावे, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
काळानुरूप तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने सुवर्णपदक विजेते एनसीसी कॅडेट उमेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना “एअरो मॉडेलिंग” या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. Character Building Camp त्यांनी विविध एअरो मॉडेल्सचे प्रात्यक्षिक उड्डाण करून त्यातील सुटे भाग, त्यांची कार्यपद्धती आणि तांत्रिक वैशिष्ट्ये समजावून सांगितली. शिबिरार्थींशी संवाद साधताना त्यांनी स्वतःचे अनुभव कथन करत “सु-संस्कारी युवापिढीच राष्ट्राचे भवितव्य आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, नागपूर विद्यापीठाचे माजी खेळाडू तथा राष्ट्रीय स्तरावरील माजी एनसीसी कॅडेट मधुकर टुळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्या जगभर सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि प्रगत एअरो मॉडेलिंगचे ज्ञान भविष्यातील रोजगार आणि देशसेवेसाठी किती महत्त्वाचे आहे, Character Building Camp हे स्पष्ट केले. याशिवाय दैनंदिन जीवनात वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व, जागरूक नागरिक म्हणून कर्तव्ये आणि समाजातील चुकीच्या प्रवृत्ती ओळखण्याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “आदर्श युवा पिढीच राष्ट्रनिर्मितीत प्रभावी योगदान देऊ शकते,” अशा शब्दांत त्यांनी शिबिरार्थींना प्रेरणा दिली.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र