अड्याळ वनपरिक्षेत पुन्हा एक मादी बिबट जेरबंद

    दिनांक :18-May-2026
Total Views |
भंडारा ,
leopard captured अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या उमरी येथे आज सकाळी एका दीड ते दोन वर्षाच्या मादी बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या या बिबट्याला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. आज 18 मे रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास पर्याय वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या नियत क्षेत्रात उमरी गावाजवळ नहराच्या सिमेंट पायलीमध्ये बसून असल्याची पोलीस पाटील प्रफुल्ल सावरबंधे यांनी वनविभागाला दिल माहिती मिळतात भंडाऱ्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक सचिन निलख, अड्याळचे वनपरिक्षेत्राधिकारी शर्मा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह बचाव कृती दलाच्या पथकाला घेऊन दाखल झाले.
 
 

leopard captured 
 
 
 
बिबट असलेल्या ठिकाणी शेकडो लोकांचा जमा होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये याची काळजी घेत पायलीच्या एका तोंडावर पिंजरा ठेवून दुसरीकडून पायरी बंद करण्यात आली. काही वेळातच बिबट पिंजऱ्यात येऊन बसल्याने त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. वैद्यकीय तपासणी बिबट सुदृढ असल्याचे आढळून आल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याच महिन्यात एक तारखेला याच वनपरिक्षेत्रांतर्गतच एक मादी बिबट आणि दोन पिल्लांना वनविभागाने जेरबंद केले होते. त्यामुळे पंधरा दिवसातील ही दुसरी घटना म्हणता येईल.
काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचे पशुधनावर हल्ले वाढले होते. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. आजच्या या कारवाईमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.leopard captured भंडाऱ्याचे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सहायक उपवनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्राधिकारी शर्मा, शुभम मोदनकर, संदीप भुसारी, निलेश श्रीरामे, आर. डी. कोदाने व अन्य वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.