तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ayurveda-colleges : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या ‘सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस’द्वारे राबविण्यात येणाèया अत्यंत प्रतिष्ठित ‘पीजीस्टार’ योजनेअंतर्गत, यवतमाळ येथील आयुर्वेद सेवा समितीद्वारा संचालित डायाभाई मावजी मजिठिया आयुर्वेद महाविद्यालयाचे पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. दिनेश राठोड यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संशोधन मार्गदर्शक डॉ. राजीव मुंदाने यांच्या कुशल प्रकल्पांमध्ये मानाचे स्थान या संशोधन प्रकल्पाला देशभरातील निवडक प्रकल्पांमध्ये मिळाले आहे.
आयुर्वेद क्षेत्रातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी आणि त्याला पुराव्यांची जोड देण्यासाठी ‘पीजीस्टार’ ही देशव्यापी योजना राबवली जाते. या योजनेसाठी देशभरातील विविध आयुर्वेद 200 महाविद्यालयांतून आलेल्या प्रस्तावांची अत्यंत कठोर तांत्रिक छाननी केली जाते आणि त्यानंतरच केवळ गुणवत्तापूर्ण संशोधन प्रकल्पांना आयुष मंत्रालयाकडून थेट आर्थिक व तांत्रिक पाठबळ दिले जाते.
संशोधनाचा विषय आणि वैद्यकीय महत्त्व
डॉ. दिनेश राठोड यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील संशोधनाचा विषय हृदयरोग, ताणतणाव आणि वेगाविधारण असा आहे. आजच्या गतिमान आणि धावपळीच्या जीवनशैलीत शारीरिक मल, मूत्र इत्यादी क्रोध तसेच मानसिक ताण वेगांचे धारण करणे अत्यंत सामान्य झाले आहे.
या सवयींचा आणि सततच्या ताणतणावाचा हृदयाच्या कार्यावर होणारा घातक परिणाम, याचे सखोल शास्त्रीय विश्लेषण या प्रकल्पातून केले जाईल. आधुनिक जीवनशैलीजन्य विकार आणि आयुर्वेदाचा दृष्टीकोन यांची सांगड घालणारे हे संशोधन आहे.
या सखोल आणि अत्यंत तांत्रिक संशोधन कार्यासाठी डॉ. राठोड यांना प्राचार्य तथा मुख्य संशोधन मार्गदर्शक डॉ. राजीव मुंदाने यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. रोगनिदान आणि विकृती विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. उमेश पाटील आणि सहायक प्राध्यापक डॉ. संजय पावडे या तज्ञ प्राध्यापकांच्या सूक्ष्म विश्लेषण आणि मोलाचे शैक्षणिक व तांत्रिक सहकार्य लाभले.