बेस स्कूलचे फुटबॉलपटू राज्यस्तरावर झळकणार

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नागपूर,
Base School Footballers बेस स्कूल ज्युनिअर कॉलेज, कोराडी रोडसाठी अभिमानाची बाब म्हणजे शाळेतील प्रतिभावान खेळाडूंची गोंदिया येथे आयोजित राज्यस्तरीय 7-ए-साईड फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी होणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये निकित गुरनानी, कौस्तुभ पुरोहित, आरव वरकडे, देवांश चांभारे, केतनसिंह चौहान आणि अजिंक्य कश्यप यांचा समावेश आहे. उत्कृष्ट कामगिरी, शारीरिक तंदुरुस्ती आणि खेळातील कौशल्याच्या जोरावर या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.
 
Base School Footballers
 
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापनाने खेळाडूंचे अभिनंदन केले. संचालक दिनेश गौर, सोनू बुर्रेवार आणि नरेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य प्रा. गौरव एम. के. माहुले यांच्या नेतृत्वात संस्था विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही सातत्याने प्रोत्साहन देत आहे. Base School Footballers  खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक लालसिंग यादव यांच्या प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सततच्या प्रेरणेला दिले आहे.
 
शाळा प्रशासनाने आपल्या संदेशात म्हटले आहे, “आमच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड होणे ही संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब आहे. हे खेळाडू स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे तसेच नागपूरचे नाव उज्ज्वल करतील, असा आम्हाला विश्वास आहे.” बेस स्कूल ज्युनिअर कॉलेज क्रीडा क्षेत्रातील प्रतिभेला सातत्याने प्रोत्साहन देत असून, येथील विद्यार्थी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत.
सौजन्य: लालसिंग यादव, संपर्क मित्र