चंद्रपूरकर उष्णतेने त्रस्त; पारा 43.8 अंश सेल्सिअस!

    दिनांक :18-May-2026
Total Views |
चंद्रपूर, 
chandrapur-suffer-from-the-heat : मे महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी 44.0, तर सोमवारी 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.
 

K 
 
 
 
विदर्भात उषणतेची लाट सुरू असून, वर्धा 46.5, अमरावती 46.4, अकोला 46.3, नागपूर 44.4, यवतमाळ 44.4, वाशिम 44, गोदिंया 43.8, बुलढाणा 43.6, तर गडचिरोली जिल्ह्यात 43.6 एवढ्या तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. दुपारी महानगरात तप्त उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक घराबाहेर निघणे टाळत आहे.