समुद्रपूर,
domestic-dispute : तालुक्यातील कारडा येथील राहत्या घराजवळील तलावात आई आणि मुलांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना आज सोमवार १८ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. शीतल जगदीश कुंभेकर (३०) हिने मुलगा हिमांशू (३) याच्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
आज सकाळी घरातील सर्वांसाठी नाश्ता बनवून ती मुलगा हुमांशू सोबत घराबाहेर पडली आणि तिने आत्महत्या केली. पत्नी घरी दिसत नसल्याने चौकशी केली मात्र ती दिसली नाही. दुपारी १२ च्या दरम्यान घराजवळील तलावात मृतदेह दिसल्याने ठाणेदार रवींद्र रेवतकर यांना माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी कारडा गावात जाऊन आई-मुलाचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. शीतलचा मोबाईल दोन-तीन दिवसांपासून बंद होता. तिला पती जगदीश कुंभेकरची भीती वाटत होती. त्यामुळे तिने मुलासह आत्महत्या केली असल्याची माहिती मृतक शीतलचे वडील जगदीश गोहणे रा. सावरी (माकोडा) यांनी पोलिसांना दिली.