ग्वांग्शी,
earthquake चीनमध्ये भूकंपाने हाहाकार माजवला असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत, तसेच १३ इमारतींचे नुकसान झाले आहे. चीनला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. सोमवारी (१८ मे) पहाटे चीनच्या दक्षिणेकडील ग्वांग्शी प्रांतात भूकंप झाला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.२ होती. अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत.
ग्वांग्शीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासनाने ७,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, आपत्कालीन कर्मचारी बचाव आणि मदतकार्य करत आहेत. अनेक लोक इमारतींमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
१३ इमारती उद्ध्वस्त
चीनच्या सरकारी वृत्तसंस्था सीसीटीव्हीनुसार, भूकंपामुळे किमान १३ इमारती उद्ध्वस्त झाल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत, परंतु कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. जखमींपैकी चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः रेल्वे वाहतूक, तपासणीनंतरच पूर्ववत केली जाईल.
शोधकार्य सुरू
भूकंपामुळे मोठे नुकसान झालेले नाही आणि वीज वाहिन्या, पाणीपुरवठा, गॅस सेवा आणि रस्ते वाहतूक सामान्यपणे सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने लोकांना बाधित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेक इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य तीव्र केले आहे. नुकसान झालेल्या इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
चीनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपानंतर रेल्वे मार्गांची मजबुती सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा तपासणी केली जात आहे. यामुळे काही गाड्यांच्या वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो आणि प्रवाशांना विलंब होऊ शकतो.earthquake चीनच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या भागात निगराणी वाढवली असून, भूकंपाचे धक्के बसण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.