कारंजा (घा.),
fire-in-mahavitaran-office : येथील महावितरण कार्यालय परिसरात भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना आज १८ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कार्यालय परिसरातील मोकळ्या जागेतील वाळलेल्या झुडपाला आग लागली. आगीने परिसरातील साहित्य आपल्या कवेत घेत रौद्ररुप धारण केले होते. आग लागल्याचे लक्षात आल्याचे निदर्शनास येताच महावितरणच्या कर्मचार्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या साधनांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाहिले तसे यश आले नव्हते. दरम्यान आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. पण वेळीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले नव्हते. परिणामी आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग परिसरात असलेल्या सोलर प्लांटलाही आपल्या कवेत घेवू पाहत होती. आग नेमकी कशाने लागली हे वृत्तलिहिस्तोवर कळू शकले नाही.