घरफोडीत 2.22 लाखांचा मुद्देमाल लंपास

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
burglary : तालुक्यातील कुपटी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोफळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
 
 
y1
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुमन दिगांबर सूर्यवंशी (वय 61, कुपटी, ता. उमरखेड) या आपल्या कुटुंबासह नव्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या जुन्या घरात पाण्याची मोटार तसेच काही मौल्यवान वस्तू होत्या. रविवारी संध्याकाळी त्या जुन्या घरात तुरीची डाळ काढण्यासाठी गेल्या असता, प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये ठेवलेल्या स्टीलच्या पेटीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवून त्या परत नव्या घरी आल्या होत्या.
 
 
चोरी गेलेल्या मुद्देमालात सोन्याच्या बिंदल्या, मंगळसूत्र, कानातील दागिने, आठ सोन्याच्या अंगठ्या तसेच 1 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 
 
या प्रकरणी पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज तपासत असून डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट व एफएसएल पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.