वर्धा,
granthalaya-bharati-vidarbha-province : वर्धा जिल्हा ग्रंथालय भारतीची बैठक १६ रोजी सायंकाळी सार्वजनिक वाचनालय साईनगर येथे झाली. या बैठकीत नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीला रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, ग्रंथालय भारती विदर्भ प्रांत सदस्य डॉ. उमाजी नाल्हे प्रांतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.

जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांचे उमाजी नाल्हे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्रथम सत्रात ग्रंथालय भारती संघटनविषयी चर्चा झाली. द्वितीय सत्रात ग्रंथालय भारती संघटनेने कोणते कार्य, कार्यक्रम, उपक्रम केले पाहिजे आणि तृतीय सत्रात ग्रंथालय भारती संघटन व वाचन संस्कृती वाढावी या विषयावर चर्चा झाली. विदर्भ प्रांत संघटन सचिव राजेश राठोड यांनी ग्रंथालय भारती संघटनेचे उद्दिष्ट, कार्य व कार्याविषयी माहिती दिली. यावेळी वर्धा जिल्हा नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष : मेघजित वझे, उपाध्यक्ष : अनूप भोयर, सचिव : योगेश ताजनेकर (आर्वी), सहसचिव : अनिकेत शिंगोटे, कोषाध्यक्ष : सव्यासाची देशपांडे यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून विनीत कोठारी, आकाश दाते, योगेश शेंडे, पुजा शिंगोटे, अपुर्वा जलताडे यांचा समावेश आहे.
उमाजी नाल्हे, जेठानंद राजपूत यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन करून नवीन कार्यकारिणीला व ग्रंथालय भारती संघटनेला शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मेघजित वझे व सचिव योगेश ताजनेकर यांनी मनोगत व्यत केले.