चोरीतील तीन सराईत गुन्हेगार ताब्यात

शहर डीबी पथकाची कारवाई

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
habitual-thief : यवतमाळ शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक नाकाबंदी व पेट्रोलिंग असताना गोदाम चोरीतील तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले.
 
 
habitual-thief
 
 
 
धामणगाव रोडवरील बजाज यांचे गोदामामधून सोलरला लागणारे महागडे वायर बंडल काही व्यक्ती चोरून नेत असल्याच्या माहितीवरून पोलिस डीबी पथकाने धामणगाव मार्गाने व गोदामाच्या खुल्या जागेत अंधारात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊन सापळा रचला.
 
 
चोरी करणाèया व्यक्तींनी पोलिसांची चाहूल लागताच तेथून पळ काढला. पण त्यांचा पाठलाग करून त्यांना धामणगाव रस्त्यावर सापळा रचून पकडण्यात आले. या व्यक्तींच्या ताब्यातून ओरिएन्ट सोलर 12 बंडल प्रत्येकी 26,550 रुपयांप्रमाणे एकूण किंमत 3,18,600 रुपये आणि गुन्हा करतेवेळी वापरलेले वाहन स्प्लेंडर वाहन किंमत 90,000 रुपये असा एकूण 4,08,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
आरोपी अक्षय भास्कर सहारे (वय 32), सचिन भिवाजी मेश्राम (वय 45), प्रदीप मधुकर नंदेश्वर (वय 38, सर्व राहणार तलावफैल, यवतमाळ) यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध तक्रारदार सतीश वडनलवार यांनी तक्रार देऊन गुन्हा नोंदवला आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, ठाणेदार रामकृष्ण जाधव यांचे मार्गदर्शनात डीबीचे गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, प्रदीप कुरडकर, पवन तडसे, मयूर तेल्लेवार यांनी पार पाडली.