लखीमपूर,
accident lakhimpur लखीमपूरमध्ये सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पिलीभीत–बस्ती राष्ट्रीय महामार्ग ७३० वर सिसैयाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची आणि प्रवाशांनी भरलेल्या टाटा मॅजिक व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की मॅजिक व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना मोठी कसरत करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मॅजिक व्हॅनमध्ये सुमारे १२ प्रवासी होते आणि ती लखीमपूरहून इसानगरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने अतिवेगात आलेल्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना आणि मृतदेहांना बाहेर काढले आणि त्यांना सीएचसी खमारिया येथे दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले.
गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.accident lakhimpurकाही वेळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. ख्याती गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपासही सुरू करण्यात आला आहे.