भारताकडून डच पंतप्रधानांच्या चिंतेला सडेतोड उत्तर

    दिनांक :18-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Dutch Prime Minister भारतामध्ये माध्यम स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत होत असलेल्या घटाच्या आरोपांना भारताने स्पष्टपणे नकार दिला आहे. देश एक मजबूत लोकशाही असून सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली जाते, असे परराष्ट्र मंत्रालयाने ठामपणे सांगितले आहे. नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटन यांनी भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर यासंदर्भात प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयातील पश्चिम विभागाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ॲमस्टरडॅम येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी भारत हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा, विविधतेने नटलेला आणि प्राचीन संस्कृती असलेला देश असल्याचे सांगितले.
 
PM MODI
 
भारतामध्ये विविध धर्मांचा उगम झाला असून हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्म यांची मुळे भारतातच आहेत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच ज्यू समुदायाला भारतात कधीही छळाचा सामना करावा लागला नाही, हे भारताच्या सहिष्णुतेचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. Dutch Prime Minister देशातील सर्व अल्पसंख्याक समुदाय शांततेत आणि सुरक्षिततेत वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढल्याचेही त्यांनी नमूद केले आणि भारताने लोकशाही मूल्यांना धरून विकास साधला असल्याचे सांगितले. हिंसाचाराऐवजी लोकशाही मार्गाने गरिबीशी लढा दिला गेला, असेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड्स दौऱ्यात दोन्ही देशांनी संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासाठी करार करण्यात आले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.