कारंजा (घा.),
karanja-begging-movement : पेट्रोल, डिझेल, खते, बियाणे आणि शेती उपयोगी साहित्याच्या दरवाढीमुळे आधीच शेतकरी होरपळून निघाला आहे. त्यातच भर म्हणून कारंजा येथील कृषी विभागात शेतकर्यांकडून प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करत प्रहार जनशती पक्षाच्या वतीने आज १८ रोजी भीक मागो आंदोलन करण्यात आले.
शेतकर्यांची सद्यस्थिती सरकार आणि प्रशासनासमोर मांडण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अंगावर फाटलेले कपडे परिधान केले होते. तर हातात कटोरा आणि गळ्यात टापर बांधून जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा काढून येथील कृषी विभागाच्या कार्यालयावर धडक देण्यात आली. शेतकर्यांकडून पैसे उकळणार्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना निलंबन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.