अचलपूर,
love-jihad-case : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात लव्ह जिहादसारखे प्रकरण पुढे आले असून आता पुन्हा एकदा खोट्या ओळखीचा डाव रचून अल्पवयीन मुलीच्या अब्रूवर घाला घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपूर नावाने ओळख करून अल्पवयीन मुलीशी संबंध प्रस्थापित करणारा मोहम्मद शारीक मो. शरीफ रा. अशरफपुरा याच्या विरोधात परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परतवाड्यातील १५ वर्षीय मुलीला आरोपीने आधी खोटी ओळख सांगून जाळ्यात ओढले. आपण हिंदू असून कपूर आडनाव असल्याचे सांगितले. त्यानंतर ४ मे ते ८ मे दरम्यान गावातील महादेव मंदिराजवळील निर्जन शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. एकदा फसवल्यानंतर आरोपी इथेच थांबला नाही, तुझी बदनामी करेन अशी धमकी देऊन त्याने मुलीला गप्प केले आणि वारंवार अत्याचार केला. अखेर असह्य झाल्याने पीडितेने धीर करून आईकडे आपबीती सांगितली. आईसोबत थेट परतवाडा पोलिस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा खरा चेहरा उघड केला. कपूर नावामागे दडलेला मोहम्मद शारीक मो. शरीफ याला बेड्या ठोकल्या आहे. या नराधमावर भारतीय न्याय संहितेच्या बलात्कार कलमासह, पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६४ , ६४ (२) सहकलम ४, ६ व कलम ३७६ अन्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मदत करणार्यांनाही सोडणार नाही !
मी परतवाडा ठाणेदारांशी बोललो. आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. त्याला मदत करणारे आणखी असेल तर त्यांना सोडल्या जाणार नाही. शहरात घडलेली घटना निंदनीय असून या लव्ह जिहाद संदर्भात हिंदूंची जनजागृतीही करू.
-आमदार प्रवीण तायडे