तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
vikas-meena : जिल्ह्यातील 16 तालुक्यांतील 110 पैकी 109 मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या मंडळातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवार, 18 मे रोजी पत्रपरिषदेत दिली.
पुढे बोलताना मीना म्हणाले, सर्व मंडळात या शिबिरांमार्फत सर्वच सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. गावातील नागरिकांचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून शिबिराबाबत जनजागृती केली. आवश्यक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात आरोग्य, शिक्षण, पोलिस, पशुसंवर्धन, कृषी आदी 22 विभागांनी लाभार्थ्यांना योजनेची माहिती दिली.
काही शिबिरात संबंधित मंडळातील शाळेतील विद्यार्थ्यांंचा समावेश करून प्रभातफेरी काढण्यात आली. यातून नागरिकांना माहिती देण्यात आली. शिबिरामध्ये तरुणांसाठी उच्च शिक्षणाबाबत मार्गदर्शन व्याख्यान ठेवण्यात आले. हृदयविकाराचे प्राथमिक लक्षणे व त्यापासून बचाव कसा करायचा, याबद्दल व्याख्यान ठेवण्यात आले होते.
शिबिर संपल्यानंतर सर्वच मंडळाचे गुणांकन व संपूर्ण माहितीचा आढावा घेऊन उत्कृष्ट तीन मंडळ अधिकारèयांना प्रमाणपत्र वितरीत करून गुणगौरव करण्यात आला. काही मंडळ अधिकाèयांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून गुणगौरव करण्यात आला.
शिबिरात निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची एकूण संख्या 11056, 7/12 मधील दुरुस्ती संबंधित स्वीकारण्यात आलेल्या अर्जाची संख्या 4668, उपलब्ध करून देण्यात आलेल्या डीजीटल 7/12 संख्या 66,775, उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण 8 अ उताèयांची संख्या 49,066, वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या 1,40,227, एक खिडकी व्यवस्थेंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या एकूण अर्जाची संख्या 30,558 आहे.
तसेच भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या 1,289, अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या 117, जिवंत 7/12 मोहिमेंतर्गत अद्यावत अभिलेख उपलब्ध करून देण्यात आलेली संख्या 12,185 आहे.
तसेच भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्याबाबतची कार्यवाही झालेल्या प्रकरणांची संख्या 328, तुकडेबंदी करण्यानुसार प्रमाणभूत क्षेत्राच्या कमी खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमानुकूल करून अद्यावत 7/12 चे वाटप केलेल्या प्रकरणांची संख्या 28, पांदण रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेस निर्गमित केलेल्या आदेशांची संख्या 14, सर्वांसाठी घरे योजनेतून वाटप केलेल्या पट्ट्यांची संख्या 404, राज्यातील वर्ग 2 जमिनी नियमबाह्य पद्धतीने वर्ग 1 मध्ये रूपांतरित विहित पद्धतीचा अवलंब करून आवश्यक ती कार्यवाही केलेल्या प्रकरणांची संख्या 3 आहे, अशी माहिती जिल्हाधिकाèयांनी दिली.