तिरोडा,
meritorious-public-school : स्थानिक मेरिटोरियस पब्लिक स्कूल येथे इयत्ता १० वी व १२ वी सीबीएसई बोर्ड परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास शाळेचे संचालक मुकेश अग्रवाल व राणी अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संचालक मुकेश अग्रवाल म्हणाले की, सतत परिश्रम आणि स्पष्ट उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवल्यास यश निश्चितपणे साध्य करता येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शिस्त, सातत्य व आत्मविश्वास जोपासावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी इयत्ता १२ वीचे विद्यार्थी महेक शरद अग्रवाल, सागर विनय खेताडे व निशा दर्शन तिरपुडे तर इयत्ता १० वीचे दिव्यांश मनीष दुबे, मिहिर दुर्गाप्रसाद पटले, श्वेता बरिएकर, गरिमा विजय पारधी, साकेत लिल्हारे, वेद रहांगडाले, गार्गी शरणागत, समर्थ कुकडे, जानवी पारधी, सारंग गोस्वामी, कलश नागरिकर व सिद्धार्थ झरारिया या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विक्रांत नरेंद्र, सुजाता बंधराम, रतनाकर व रानू लांजेवार यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थित पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या उज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.