उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज बंद, योगी आदित्यनाथांचे स्पष्ट निर्देश

    दिनांक :18-May-2026
Total Views |
लखनौ, 
namaz on roads banned बकरीद २०२६ च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज पठणासंदर्भात कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. लखनौ येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यात सार्वजनिक रस्त्यांवर नमाज पठणाला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 
 
 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, रस्ते हे वाहतुकीसाठी असतात आणि कोणालाही सार्वजनिक रस्ते अडवून धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार नाही. ते म्हणाले, “लोक मला विचारतात की उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज पठण होत नाही का? मी सांगतो, अजिबात नाही. रस्ते चालण्यासाठी आहेत. कोणीही चौकात येऊन गोंधळ घालू शकत नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की प्रत्येक धार्मिक कार्यक्रमासाठी ठराविक जागा असतात आणि ते कार्यक्रम त्या ठिकाणीच आयोजित केले गेले पाहिजेत. प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.namaz on roads banned “जर लोक प्रेमाने आमच्याशी सहमत असतील तर उत्तम, अन्यथा आम्हाला दुसरी पद्धत अवलंबावी लागेल,” असेही योगी आदित्यनाथ यांनी ठामपणे सांगितले. बकरीदपूर्वी मुख्यमंत्री योगी यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून यंदा सणाच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असून सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबाबत प्रशासन अधिक सतर्क असल्याचे संकेत मिळत आहेत.