बुधवारी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद

    दिनांक :18-May-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Nationwide strike by drug dealers अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने २० मे रोजी देशव्यापी एकदिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. ऑनलाइन औषध विक्री वाढत असल्याने पारंपरिक औषध विक्रेत्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले असून, विविध मागण्यांसाठी हा बंद आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनांनी दिली आहे. ‘महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’ तसेच ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ यांच्या संयुक्त निवेदनानुसार देशभरातील जवळपास १२ लाख ४० हजार औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटनांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला.
 

drug dealers 
 
 
मात्र, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. संघटनांच्या मते, ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणावर औषध विक्री होत असून, अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. काही ठिकाणी बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेषतः अँटीबायोटिक्ससारखी औषधे सहज मिळत असल्याने रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मोठ्या कंपन्यांकडून कमी किमतीत औषध विक्री केली जात असल्याने छोट्या औषध विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, त्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
 
 
 
मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन
कोरोना काळातील जीएसआर २२०(ई) व जीएसआर ८१७(ई) या अधिसूचना मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराहीदेण्यात आला आहे.
आशिष जैन बंड
अध्यक्ष केमिस्ट असोसिएशन कारंजा