टाकी फुल करण्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर!

    दिनांक :18-May-2026
Total Views |
मुंबई
Petrol price देशात शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर तीन रुपयांची वाढ झाल्यानंतर आज, 18 मे रोजी विविध शहरांमध्ये इंधन दरांमध्ये किरकोळ चढ-उतार दिसून आले आहेत. राज्यांनुसार लागू होणारा मूल्यवर्धित कर (VAT), स्थानिक कररचना आणि वाहतूक खर्च यामुळे काही शहरांमध्ये इंधन दर वाढले असून काही ठिकाणी मात्र ग्राहकांना अंशतः दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये दर स्थिर राहिल्याने काही प्रमाणात स्थिरता दिसून आली आहे.
 

Petrol price 
मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर इतका कायम आहे. दिल्लीत पेट्रोल 97.77 रुपये आणि डिझेल 90.67 रुपये प्रति लीटर या दरांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल 108.70 रुपये आणि डिझेल 95.13 रुपये प्रति लीटर असून बंगळुरूमध्ये पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 94.10 रुपये प्रति लीटर या पातळीवर दर कायम आहेत.
 
 
देशातील इतर प्रमुख Petrol price शहरांमध्ये मात्र काही प्रमाणात बदल नोंदवले गेले आहेत. लखनऊमध्ये पेट्रोल 97.72 रुपये आणि डिझेल 91.01 रुपये प्रति लीटर झाले आहे. नोएडामध्ये पेट्रोल 97.76 रुपये आणि डिझेल 90.99 रुपये प्रति लीटर नोंदवले गेले असून गुरुग्राममध्ये पेट्रोल 98.47 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. भुवनेश्वरमध्ये इंधन दर 104.57 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढले आहेत. पाटण्यात पेट्रोलचा दर 108.92 रुपये प्रति लीटरवर पोहोचला असून जयपूरमध्ये 107.61 रुपये प्रति लीटर इतका दर नोंदवला गेला आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर झालेला ड्रोन हल्ला तसेच अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढते तणावपूर्ण संबंध यामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 110.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला असून त्यात 1.32 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर WTI क्रूड 107.26 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर व्यापार करत आहे.
 
 
सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी केलेली प्रति लीटर 3 रुपयांची दरवाढ ही जवळपास चार वर्षांनंतरची पहिली मोठी वाढ मानली जात आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये इंधन दरात बदल झाला होता. दरम्यान, केंद्र सरकारने विंडफॉल प्रॉफिट टॅक्समध्येही महत्त्वाचे बदल केले असून पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लीटर 3 रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू करण्यात आले आहे. मात्र, डिझेलवरील निर्यात शुल्क 23 रुपयांवरून 16.5 रुपये आणि एटीएफवरील शुल्क 33 रुपयांवरून 16 रुपये प्रति लीटर इतके कमी करण्यात आले आहे.सध्या देशांतर्गत दर स्थिर असले तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता आणि भू-राजकीय तणाव पाहता आगामी काळात इंधन दरांवर दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.