वर्धा,
rahul deshmukh व्हिएतनाममधील डा नांग येथे १० मे रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित आयर्न मॅन स्पर्धेत जिल्ह्याचे राहुल देशमुख यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आयर्न मॅनचा किताब आपल्या नावावर केला. जगातील अत्यंत कठीण समजल्या जाणार्या या स्पर्धेत १.९ किमी समुद्र पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे असा अत्यंत आव्हानात्मक प्रवास त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. विशेष म्हणजे, राहुल देशमुख यांच्या पत्नी आरंभी हिने यापूर्वीच वर्धेची सून म्हणून हायरॉस विनचा मान पटकावत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता एकाच कुटुंबातून पहिला आयर्न मॅन आणि पहिली हायरॉस विन असा दुर्मिळ मान मिळाल्याने हा क्षण संपूर्ण वर्धा जिल्ह्यासाठी अभिमानाचा ठरला आहे.

फिटनेसकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करत हे दाम्पत्य आजच्या पिढीला काम आणि फिटनेस यांचा समतोल कसा साधावा याची प्रेरणा देत आहे. व्यस्त जीवनशैलीतही सातत्य, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.rahul deshmukh वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा आणि फिटनेस क्षेत्रासाठी हा निश्चितच मानाचा क्षण मानला जात असून, या यशामुळे अनेक युवक-युवतींना फिटनेस आणि सहनशती आधारित क्रीडांकडे प्रेरणा मिळणार आहे.
या यशामागे प्रशिक्षक ओंकार, प्रतीक, वर्धन, शाल्मली आणि इंद्रजित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. अंकुश आणि डॉ. आरती यांनी वैद्यकीय सहाय्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आहार नियोजनासाठी मैत्रेयी यांचे विशेष सहकार्य लाभले.