यवतमाळ,
raju-chandekar : नवोदित आदिवासी साहित्य परिषद आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी राज्यस्तर ‘बिरसा पर्व’ उपक्रम सुरू करणारे तसेच समाजावर होणाèया अन्याय-अत्याचारांविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू चांदेकर यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी आशा चांदेकर यांचाही सन्मान करण्यात आला. नवोदित आदिवासी साहित्य परिषद व जिज्ञासा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळून समाजसेवेच्या प्रवासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.