शर्विका म्हात्रेचा ‘बुलढाणा अर्बन’तर्फे सन्मान!

वयाच्या ८ व्या वर्षी १२१ गड-किल्ले सर करण्याचा पराक्रम

    दिनांक :18-May-2026
Total Views |
बुलडाणा,
sharvika-mhatre : देशातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून ओळखली जाणारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुयातील लोणेरे येथे राहणारी ८ वर्षीय गिर्यारोहक कु शर्विका म्हात्रे हिच्या साहसाची दखल घेत बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल झंवर यांचे हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी शर्विक आई- वडील उपस्थित होते.
 
 
KL
 
 
 
शर्विका म्हात्रे हि दीड ते दोन वर्षांपासून गिर्यारोहण करत असुन तिने आतापर्यंत १२१ गडकिल्ले सर केले आहेत.तिला गडकिल्ले सर करण्याची व गडकिल्ले स्वच्छता मोहीमेत भाग घेण्याची आवड आहे. तिच्यात ही आवड तिच्या आई वडिलांमुळे निर्माण झाली असून या वर्षी २६ जानेवारी रोजी प्रबळगड किल्ल्यावर चढण्यास अतिशय कठीण असा कलावंतीण सुळका पायी चढून झेंडा फडकाविला होता. शर्विकाच्या या धाडसी साहसाचे सर्वत्र कौतुक होऊन तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड शिवाय इतरही रेकॉर्ड बुक मध्ये नाव कोरले गेले आहे. याप्रसंगी कोमल झंवर यांनी तिला भविष्यातील तिच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.