‘साहेब, आम्ही जगायचं कसं ?’ शेतकऱ्यांचा आर्त प्रश्न

पारवा परिसरात वायर चोरीचे सत्र सुरूच

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पारवा, 
wire-thefts : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस ठाण्यांतर्गत ग्रामीण भागात चोèयांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मागील महिन्यातच वघारा टाकळी येथील वाघाडी नदीकाठच्या शेतकèयांच्या मोटारपंपांचे वायर चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच, आता सायफळ येथील 6-7 शेतकèयांच्या शेतातील मोटारपंपांचे वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची नवी घटना सोमवार, 11 मे रोजी उघडकीस आली.
 
 
L;
 
 
 
नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटाशी सामना करणाèया शेतकèयांसमोर आता या नव्या संकटामुळे ‘आम्ही जगायचं तरी कसं’, असा गंभीर प्रश्न शेतकèयांसमोर निर्माण झाला आहे. या वाढत्या गुन्हेगारीमागे पारवा पोलिस ठाण्यातील पोलिसांची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.
 
 
पारवा पोलिस ठाण्यांतर्गत अनेक गावे येतात. मात्र त्या तुलनेत येथे अपुरे पोलिस कर्मचारी आहेत. पोलिसांची संख्या कमालीची घटल्याने गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. रात्री मोठ्या क्षेत्रावर गस्त घालणे सध्याच्या कर्मचाèयांना अशक्य झाले आहे. रिक्त पदांमुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला असून, त्याचा थेट फटका परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला बसत आहे.
 
 
पारवा पोलिस ठाण्यांंतर्गत गावांमध्ये केवळ वायर चोरीच नव्हे, तर जनावरे चोरी, शेतातील मोटार चोरी आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना, चोèयांमुळे आर्थिक गर्तेत सापडला आहे.
 
 
पोलिस ठाण्यात मनुष्यबळ कमी असले तरी वरिष्ठ अधिकाèयांनी तातडीने येथे फौजफाटा पुरवावा आणि पारवा ते कुर्ली व चिखलवर्धा ते सायफळ या मार्गांवर रात्रीची गस्त सुरू करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांनी व शेतकèयांनी केली आहे.
चोरांची अजब-गजब कृती, एकाची वायर आणून ठेवली
 
 
सायफळच्या संबंधित शेतकèयांनी या चोरीप्रकरणी पारवा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला. चोरट्याने चोरी केलेल्या वायरपैकी एका शेतकèयाची वायर पुन्हा त्याच्याच शेतात आणून ठेवली.
 
 
याविषयी शेतकèयाने तत्काळ पारवा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वायर ताब्यात घेतले. आता इतर शेतकèयांचीही वायर चोर अशाच प्रकारे परत आणून ठेवतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.