वर्धा,
jai-mahakali-education-institute : स्थानिक जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा अंतर्गत चालवण्यात येणार्या नारायणा विद्यालयम्मधील विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करीत ९९ टके निकाल लागला. प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्र, गोवा व दमण मिळून तयार करण्यात आलेल्या पुणे रिजनमधून चंद्रपूरचा अयानब्बास अजानी ९९.६० टके गुण घेत शाळेतून, विदर्भातून नव्हे तर देशातून दुसरा आला असल्याची माहिती जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आज १८ रोजी आयोजित पत्रकार परिषेदत दिली.
जय महाकाली शिक्षण संस्थांच्या शाळांतून दिले जाणारे शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून व्यतिमत्त्वाचे संस्कार घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजच्या काळात जेथे तांत्रिक कौशल्य आणि करिअरचे लक्ष्य महत्त्वाचे मानले जाते. येथे विद्या आणि संस्कार यांचे संयुत शिक्षण देऊन उज्ज्वल पिढी घडविण्यावर भर दिला जातो. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवर विदर्भाचे नाव मोठे केले असे पं. अग्निहोत्री यांनी सांगितले.
चंद्रपूर येथे बारावीतील (सीबीएसई) अयानब्बास अजानी ९९.६० टके, अरहता गेडाम ९७.८० टके, युती पटेल ९६.६० टके, वैदेही बहिरम ९५.८० टके, नयना पी. ९५ टके, सोहम लक्कावार ९५ टके, त्रिशा खंडेलवाल ९४.८० टके, दहावी (सीबीएसई) अद्वित बुकावार ९८.२० टके, अवनी जिभकाटे ९७ टके, पहेल पडोळे ९६.८० टके, शौर्य दुदानी ९६.८० टके, बारावी सानवी गाडगे ९५.६ टके, सानिया गुप्ता ९४.८ टके, प्लाक्षा गुप्ता ९४.६ टके, अनुष्का मिश्रा ९५.२ टके, अनंत असरे ९०.८ टके,
महिन शेख ९०.६ टके, (विज्ञान शाखा) स्नेहा पांचवरे हिने ९४ टके, दिवा लाहिला ९२.८ टके, कुशाग्र सोनी ९२.४ टके, नागपूर येथील दहावी (सीबीएसई) प्रथम उत्तरवार ९९ टके, नारायणी पाटील ९८.६ टके, शौर्य पाटील ९८.४ टके, अमरावती येथील बारावी (सीबीएसई) आयुष गोल्हर ९४.२ टके, शुभम साबू ९३.६ टके, रुलिशा नागदीवे ९२.२ टके, सिद्धांत मेश्राम ९१ टके, दहावी (सीबीएसई) श्रावणी जाधव ९८ टके, सुरभी मोहोळ ९७.८ टके, साची इंगळे ९७.६ टके, महेक केडिया ९६.४० टके, दीविका मोहोड ९६.२ टके, दृष्टी वानखडे ९६ टके, गिरीजा वाघ ९५.८० टके, सिया जाधव ९५.६० टके, स्नेहल नागरे ९५.६० टके, अजिंय उगले ९५.४ टके, राजवीर वासनकर ९५.२ टके गुण मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. जी. आर. जंगमवार, डॉ. चंद्रकांत कोठारे, डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. रितेश सुळे, डॉ. राम बावनकर, अभिजित रघुवंशी, गजानन पोकळे यांची उपस्थिती होती.