फाशी घेऊन आत्महत्या

    दिनांक :18-May-2026
Total Views |
आर्णी,
suicide-by-hanging : तालुक्यातील साकूर येथे शेतमजुराने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार, 17 मे रोजी घडली. शैलेश अंबादास गेडाम (वय 42) असे मृत शेतमजुराचे नाव आहे. शैलेश गेडाम हे रविवारी आपल्या घरासमोरील झाडाखाली बाज विणत होते. दुपारी घरातील सदस्य आराम करत असताना त्यांनी घरातील शौचालयात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्णीला पाठवला. मात्र आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. शेतकरी आत्महत्येनंतर आता शेतमजुरांच्या आत्महत्या होत असल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.
 
 

y18May-Shailesh-Gedam