समुद्रपूर,
sameer-kunawar : तरुण पिढी विविध व्यसनांच्या आहारी जाऊन स्वत:सह कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करीत आहे. तरुणांनी व्यसनापासून दूर जाऊन एक आदर्श माणूस म्हणून जगण्याची गरज असल्याचे मत आ. समीर कुणावार यांनी व्यत केले.
कांढळी येथे आयोजित व्यसनमुती मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यसनमुतीचे प्रणेते लतुजी महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.चे माजी उपसभापती योगेश फुसे, माजी उपसरपंच किशोर औचट, माजी सरपंच राजेश थोरात, गोपाळ वंगळ, संदीप फुसे, रविंद्र दांडेकर, रामकृष्ण इंगोले, समाजसेवक अनिकेत गिरडकर यांची उपस्थिती होती.
आ. कुणावार पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस तरुण, युवक तसेच पुरुष व्यसनाधीन होत चालले असून या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. माणसला भती, आध्यात्म आणि समाजसेवेचे व्यसन असले पाहिजे. ते समाजात एक आदर्श निर्माण करू शकते. व्यसन मानवी जीवनासाठी घातक असून व्यसनमुती संबंधी जनजागृती करणे काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले.
कांढळी येथील १०० हून अधिक नागरिकांनी व्यसनमुतीचा संकल्प घेतला.