तभा वृत्तसेवा
महागाव,
gunj-phulsawangi-road : गुंज ते फुलसावंगी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करून कंत्राटदारांमार्फत खड्डे बुजविण्याचे काम करण्याचा बनाव करीत निम्मे बिल कंत्राटदाराला अदा केले असल्याचा धक्कादायक प्रकार महागाव उपविभागात उघड झाला आहे.

संग्रहित फोटो
सार्वजनिक बांधकाम विभाग पुसदमधील सावळागोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला असून महागाव तालुक्यातील गुंज ते फुलसावंगी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करून खड्डे बुजवण्याचे काम पुसद येथील कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र कंत्राटदाराने गुंज ते कलगाव खड्डे बुजवण्याचा केवळ देखावा करून, अधिकाèयांशी संगनमत करून निम्म्या रकमेचे बिलही उचलल्याची माहिती आहे.
या रस्त्यावरून वाहने चालवणे तर दूरच, पायी चालणेसुद्धा जिकिरीचे झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जाऊन एकाच कंत्राटदाराला काम देऊन कामाचा केवळ देखावा करीत निधीची लूट होत आहे. नागरिकांनी या बोगस खड्डे बुजवण्याच्या कामाची तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे लक्ष न देता सर्व काही ‘आलबेल’ असल्याचे दर्शवीत आहे.
केवळ खड्डे बुजवण्याच्या नावावर सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व कंत्राटदारांच्या जोडगोळीने शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीवर डल्ला मारत असल्याची परिसरात चर्चा सुरू आहे.
सा. बां. विभागाच्या वरिष्ठ अधिकाèयांनी या प्रकाराची निष्पक्ष चौकशी केल्यास यातील संबंधित अधिकारी व कंत्राटदाराने केलेले काळे कारनामे बाहेर येतील. त्यामुळे या रस्त्याच्या आतापर्यंत झालेल्या काम, आलेला निधी, खर्च झालेला निधी याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बोगस कामे करणाèया कंत्राटदाराला काळया यादीत टाका
गुंज ते फुलसावंगी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दरवर्षी केले जात असून याकरीता लाखो रुपयांचा निधी खर्च होतो. हे काम एकाच कंत्राटदाराला वारंवार देण्यात येते. कंत्राटदार व अधिकारी यांच्या ‘मिलीभगत’मुळे केवळ खड्डे बुजवण्याचा देखावा करून शासनाचा निधी हडपून आजही रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’च आहेत. नागरिकांनी या बोगस कामाच्या तक्रारी केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाèयांनी याकडे लक्ष देऊन चौकशी करून संबंधित अधिकाèयांवर खातेनिहाय कारवाई करावी तसेच कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे. यावर कारवाई न झाल्यास सा. बां. विभागाविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.
सुनील चव्हाण
मनसे तालुकाध्यक्ष, महागाव