नागपूर,
Unique Wedding Anniversary प्रभाग क्रमांक ३३, हावरापेठ येथील भाजपा शहर कार्यकारिणी सदस्य मंगेश मोरे आणि रंजनी मोरे यांच्या विवाहाला २१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचा लग्न वाढदिवस सामाजिक उपक्रमातून उत्साहात साजरा करण्यात आला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्षमय जीवन जगत मंगेश मोरे यांनी फॅब्रिकेशन व्यवसायाची सुरुवात केली. आज त्यांनी “संकल्प फॅब्रिकेशन” हा स्वतःचा नामांकित व्यवसाय स्वबळावर उभा केला आहे. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
याशिवाय कर्करोगग्रस्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यापासून ते त्यांच्या उपचार आणि शस्त्रक्रियेपर्यंत रुग्णांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहतात. Unique Wedding Anniversary आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना स्वतःच्या वाहनाने गावी पोहोचवून आर्थिक मदत करण्याचे कार्यही ते करतात. तसेच व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्यांना नवजीवन देण्याचे कार्यही ते सातत्याने करत आहेत.
अशा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मंगेश मोरे आणि त्यांना साथ देणाऱ्या रंजनी मोरे यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने एकत्र येत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई, ग्रामगीता आणि भेटवस्तू देऊन सहपत्नीक सत्कार केला. तसेच अधिकमास आणि लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. Unique Wedding Anniversary यावेळी दिनेशभाऊ तराळे, राजू इटनकर, अनिकेत बांगडे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, संजय उईके, गजेंद्र मडावी, मनोहर मोरे तसेच इतर मित्रपरिवार उपस्थित होता.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र