तभा वृत्तसेवा
पुसद,
riya-anvesh-ahale : जनता शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय येथील बारावी विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थिनींनी उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी बारावीत महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे 96 पैकी 95 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सरासरी निकाल 98.80 टक्के आहे. पहिले तीन प्रथम रिया अहाळे 80.50, द्वितीय नंदनी पंजाब जाधव 75.50, प्रांजली विकास डांगे 72.5, रिया अन्वेस आहळे जेईईमध्ये 99 टक्क्यांसह महाविद्यालयातून प्रथम आली.
बारावी कलामधून तन्वी पंकज चव्हाण महाविद्यालयातून सर्वप्रथम आली 71, तर नेहा सलीम शेख 69.50, आरती शेषराव हातमोडे 68.50, बारावी विज्ञान व कला शाखेतील अनुभवी शिक्षकांच्या परिश्रमातून व सातत्याने विद्यार्थिनीला केंद्रबिंदू विशेष प्रयत्न केल्या गेले.
तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, सोबतच विद्यार्थिनी ज्या शाखेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यामध्ये त्यांना अधिक उत्कृष्ट शिक्षण कसे देता येईल व त्यांची शैक्षणिक प्रगती कशी करता येईल, यावर सातत्याने या महाविद्यालयातील प्राध्यापक प्रयत्न करीत असतात आणि त्यांच्या परिश्रमांची फलश्रुती म्हणजे येथील विद्यार्थिनींनी उत्तीर्ण होण्याची परंपरा कायम राखली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक धोरणासोबतच विविध कौशल्य त्यांच्यात विकसित कसे होतील, यावर सातत्याने ते भर देत मार्गदर्शन करतात. बारावी विज्ञान आणि कला शाखा यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्रथम आल्यात व ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आल्यात अशा विद्यार्थ्यांचे अभिनंदन तथा कौतुक व सोबतच त्यांना सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करणाèया विज्ञान व कला शाखेचे प्रा. अनिल राठोड, प्रा. प्रकाश काळे, प्रा. पल्लवी राठोड, प्रा. आशालता बरडे, प्रा. पूनम बंग, प्रा. दीपा काळीकर, प्रा. प्रमोल राठोड, प्रा. अशोक चव्हाण, प्रा. आरती डोंगरे, प्रा. वर्षा मुराई, प्रा. विलास गायधने, प्रा. कमलकिशोर पंडागळे यांचेही अभिनंदन संस्थाध्यक्ष जय नाईक व प्राचार्य डॉ. वंदना वानखेडे यांनी केले.