हरिद्वार,
Threat to Blow Up Haridwar हरिद्वारमधील प्रसिद्ध हर की पौरी घाटावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी मिळाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तराखंडमधील या पवित्र ठिकाणी दररोज लाखो भाविक गंगा स्नानासाठी येत असल्याने या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना दूरध्वनी करून पुढील काही दिवसांत हर की पौरीसह शहरातील इतर ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. Threat to Blow Up Haridwar या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत कॉल कुठून करण्यात आला याचा माग काढला.
तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले. तो पौरी जिल्ह्यातील यमकेश्वर परिसरातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून चौकशीदरम्यान त्याने मद्याच्या नशेत असा प्रकार केल्याची कबुली दिली. Threat to Blow Up Haridwar या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही माहिती देत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.