वाघाने दिला जंगलात ‘प्लॅस्टिक बॅन’चा संदेश

*पानवठ्यातील बकेट काढली बाहेर *बोर व्याघ्र प्रकल्पातील घटनाक्रम पर्यटकांकडून कॅमेराबद्ध

    दिनांक :18-May-2026
Total Views |
वर्धा,
tiger delivers plastic ban पर्यावरणाचे रक्षण करण्याचे सर्वस्तरावरून होत असतानाच विकासाच्या नावाखाली मानवाकडून अतोनात नुकसान केले जात आहे. अमर्याद झाडांची कत्तल यासह प्लॅस्टिकचा वापर होत असल्याने याचा थेट परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. मात्र, बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीच्या एका नर छाव्याने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील एका कृत्रिम पानवठ्यात असलेली प्लॅस्टिकची बकेट तोंडाने काढत पानवठ्याबाहेर फेकली. हा संपूर्ण घटनाक्रम सोमवारी सकाळी बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीचा आनंद लुटणार्‍या पर्यटकांनी कॅमेराबद्ध केला. जंगलात ‘प्लॅस्टिक बॅन’चा संदेशच यानिमित्ताने या वाघाने दिला की काय, असा अनुभव पर्यटकांना आला.
 

tiger delivers plastic ban 
 
 
जिल्ह्यात सध्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहे. वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी तसेच त्यांना जंगलातच पाणी मिळावे या हेतूने बोर व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले आहे. त्यात नियमित पाणी भरले जात आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणार्‍या पर्यटकांनी सध्या कॅटरिना नामक वाघीण व तिच्या दोन छाव्यांचे दर्शन होत असल्याने विदर्भ व विदर्भाबाहेरील पर्यटकांची पावलेही बोर व्याघ्र प्रकल्पाकडे वळत आहे. बोर प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात येणारा अंभोरा पानवठा वन्यप्राण्यांच्या तृष्णा तृप्तीसाठी उपयुत ठरतो. त्याची स्वच्छता करण्यासाठी काही साहित्य या पानवठ्याच्या परिसरात ठेवण्यात आले होते. यात प्लॅस्टिकच्या बकेटचाही समावेश होता. साहित्य तेथे पडून असतानाच सोमवारी सकाळी या पानवठ्यावर कॅटरिना व तिचे दोन नर बछड्यांचे दर्शन वर्धा येथील पर्यटकांना झाले.tiger delivers plastic ban कॅटरिनाच्या या दोन नर छाव्यांना पर्यटक लाडाने करण-अर्जून असे संबोधतात. याच दोन नर वाघांपैकी एकाने पर्यटकांच्या समोरच पानवठ्यातील प्लॅस्टिकची बकेट तोंडाने बाहेर काठून पानवठ्याबाहेर फेकली. हा संपूर्ण घटनाक्रम पर्यटकांनी कॅमेराबद्ध केला. हे संपूर्ण दृष्य बघून वाघही जंगलात प्लॅस्टिक बंदीचा काहीसा संदेश देत आहे, अशी चर्चा पर्यटकांमध्ये रंगली होती.
ताडोब्याच्या नयनतारानेही बंधार्‍यातून काढली होती प्लॅस्टिक बॉटल
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नयनतारा या वाघिणीने जांभूळडोह सिमेंट बंधार्‍यातून पाणी न पिता प्लॅस्टिकची बॉटल तोंडाने बाहेर काढली होती. तेव्हाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता बोर व्याघ्र प्रकल्पातील हा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरत होत आहे.