अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक

दुचाकीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :18-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळंब, 
unauthorized-htbt-cotton-seeds : एका दुचाकीवरून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची वाहतूक करणाèया अविनाश मधुकर येंडे याला अटक करण्यात आली. त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. त्यांच्याकडून 150 पाकिटांसह दुचाकीसह 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार, 16 मे रोजी रात्री 9 च्या सुमारास रोडवरील कळंब शहराच्या जवळ हायवेवर कळंब पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने केली.
 

y18May-H-T-B-T 
 
 
 
अविनाश मधुकर खेडे (वय 57, कळंब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आधीच निसर्गाची अवकृपा, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि कर्जाचे डोंगर यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, कळंब शहरात प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिस व कृषी विभागाला मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस व कृषी अधिकाèयांच्या पथकाने वर्धा मार्गावर सापळा रचला. यावेळी संशयास्पद दुचाकी अडवण्यात आली.
 
 
 
दरम्यान, पोलिसांना पाहून दुचाकीवरील एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मात्र दुचाकी चालकाला ताब्यात घेण्यात आले. दुचाकी वाहनावर प्लॅस्टिकच्या 3 पोत्यांमध्ये अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे आढळून आले.
 
 
या कारवाईत पोलिसांनी आर कोट-5 जी नावाच्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची 150 पाकिटे जप्त केली. या बियाण्यांची किंमत 1.65 लाख रुपये असून 60 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहीम अधिकारी प्रवीण जाधव यांच्या तक्रारीवरून आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
 
 
ही कारवाई ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाचे मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, कृषी अधिकारी कल्याण बेंद्रेकर, राहुल डाखोरे आणि मोरेश्वर येवंडवार यांनी केली. या मोहिमेला वरिष्ठ अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, नितीन लोखंडे, धीरज मोहेकर यांचे मार्गदर्शन होते.
 
 
परंतु ज्या चारचाकीने हा संपूर्ण माल कळंब शहरात दाखल होत होता, त्या वाहनातून अविनाश येंडे यांनी आपले पाकीट उतरवले. त्यामुळे ती चारचाकी कोणाची की तिने कळंबला हा अवैध साठा येत होता. या संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपीला सोडून एकच आरोपी पकडल्या गेला आणि एक फरार झाला.
 
 
या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ठाणेदार आपले कार्यालय सोडून गेले असता एका पोलिसाने रात्री 1.30 वाजता 2 लाख 20 हजार रुपयांचे लक्ष्मीदर्शन करून घेत प्रकरण हडपण्याचा प्रयत्न केला. परंतु याची चर्चा संपूर्ण गावभर झाल्याने एकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
एका पोलिसदादाच्या लक्ष्मीदर्शनाचा कार्यक्रम झाल्याची चर्चा कळंब शहरात सुरू असून पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी याकरिता कळंबातील शेतकरी लवकरच कृषी अधिकारी तथा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे. त्यामुळे पोलिसदादाचा जीव सध्या टांगणीला लागला असून पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे शेतकèयांचे लक्ष लागले आहे.