आयडाहोमध्ये भीषण दुर्घटना: हवाई प्रदर्शनात दोन जेट विमानांचा स्फोट

    दिनांक :18-May-2026
Total Views |
वॊशिंग्टन,
jet planes accident अमेरिकेतील आयडाहो येथे एका हवाई प्रदर्शनादरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे. अमेरिकी नौदलाची दोन अत्याधुनिक एफ-१८ लढाऊ विमाने हवेत एकमेकांवर आदळून मोठा स्फोट झाला असून दोन्ही विमाने पूर्णपणे नष्ट झाली आहेत. या घटनेमुळे अमेरिकी नौदलाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
 

आयडाहो येथे एका हवाई प्रदर्शना
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हवाई प्रदर्शन सुरू असताना दोन एफ-१८ लढाऊ विमाने अत्यंत जवळून हवाई कसरती करत होती. त्याच दरम्यान अचानक दोन्ही विमानांची हवेत धडक झाली. सुरुवातीला प्रेक्षकांना हे स्टंटचा भाग वाटत होते, मात्र काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि विमानांचे तुकडे हवेतून खाली पडू लागले.
या धडकेनंतर दोन्ही विमाने वेगाने जमिनीकडे कोसळली आणि काही क्षणांतच भीषण स्फोट झाला. आगीचा मोठा भडका उडाल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये आकाशात धुराचे आणि आगीचे मोठे लोट दिसत आहेत. अपघातादरम्यान विमानातील चारही कर्मचारी पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडण्यात यशस्वी झाले. सुदैवाने, सर्व जण सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही कर्मचारी अपघातस्थळाजवळ सुरक्षितपणे उतरल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर अमेरिकी नौदलाच्या पॅसिफिक फ्लीट नेव्हल एअर फोर्सेसच्या प्रवक्त्या कमांडर अमेलिया उमायम यांनी सांगितले की, दोन्ही विमानांमधील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.jet planes accident ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून अत्याधुनिक एफ-१८ लढाऊ विमानांचा सहभाग असल्याने अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.