महालमध्ये मध्यरात्री दाेघांवर गाेळीबार

- सीसीटीव्ही फुटेज व्हायरल :प्रेयसीवरुन वाद पेटला

    दिनांक :18-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime news शहरातील अत्यंत गजबजलेल्या महाल परिसरातील काेठी राेडवर रविवारी मध्यरात्री झालेल्या गाेळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली. दाेन गुन्हेगारांमध्ये आर्थिक आणि प्रेयसीवरुन वाद झाल्याने हा गाेळीबार करण्यात आला. महालमध्ये अचानक गाेळीबारीची घटना घडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. रवी माेहताे आणि गंगा काकडे अशी आराेपींची नावे आहेत. या प्रकरणी एका आराेपीला काेतवाली पाेलिसांनी 3 तासांतच अटक केली.
 
 
nagpur crime news
 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी साैरव घाटे हा महालमधील काेटी राेडवर राहताे. त्याची आराेपी रवी माेहताे, प्रज्ज्वल ऊफर् गंगाभाई काकडे, राेहन, यांच्यासाेबत मैत्री हाेती. त्यामुळे आराेपी आणि सौरव एकमेकांना ओळखतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून साैरव याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्याला राेहनने साथ दिली. ताे गंगाभाई आणि माेहताे यांच्यापासून दूर झाला. हीच बाब आराेपींना खटकत हाेती. यादरम्यान, राेहनची प्रेयसी साेफिया हिला गंगाभाईने फूस लावून स्वतःच्या टाेळीत सहभागी करुन घेतले. तीसुद्धा एमडी ड्रग्ज तस्करीतील आराेपी आहे. प्रेयसीला हिरावल्यामुळे राेहन हा चिडलेला हाेता. त्याने साैरव घाटेसह गंगाभाईला साेफियापासून दूर राहण्याची धमकी दिली. सोफियावरुन सुद्धा दाेन्ही टाेळ्यांमध्ये धुसूफुस सुरु हाेती. गेल्या काही दिवसांपूर्वी साैरव आणि माेहताे यांच्यात वर्चस्वाच्या वादातून ठिगणी पडली. तेव्हापासून ते दाेघेही एकमेकांना बघून घेण्याची धमकी देत हाेते. रविवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास तीन दुचाकींवरून सहा जण काेठी राेड परिसरात आले. त्यांनी दाेन गाेळ्या साैरवच्या दिशेने झाडत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आराेपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणात तक्रारदार साैरभ घाटे याने रवी माेहताे आणि गंगा काकडे यांच्यावर गाेळीबार केल्याचा आराेप केला आहे. पाेलिसांच्या प्राथमिक तपासात परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचे समाेर आले आहे.
टाेळीयुद्ध भडकण्याची शक्यता
पाेलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाेळीबार करणाऱ्या आराेपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आराेपींवर यापूर्वी अंमली पदार्थ विक्री आणि बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत. आर्थिक वाद आणि प्रेयसी सोफियाला हिरावल्यामुळे दाेन गटांमधील वर्चस्वाच्या अंतर्गत वादातूनच हा प्रकार घडला.nagpur crime news महाल परिसरात ही घटना घडताच ठाणेदार रितेश अहेर हे लगेच घटनास्थळावर पाेहचले. त्यांनी वरिष्ठ पाेलिस अधिकाèयांनी दिली. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सध्या काेतवाली पाेलीस पुढील तपास करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
मध्यरात्रीच्या सुमारास गाेळीबारीची घटना घडल्यानंतर काही तासांतच इंस्टाग्राम आणि व्हाॅट्सअपवर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. सहा आराेपी शस्त्रासह दुचाकीने गाेळीबार केल्यानंतर पळून जाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ दुपारपर्यंत अनेक व्हाॅटसअप ग्रूपवर फिरत हाेता.
...........
सीसीटीव्ही फुटेजवरुन आम्ही तपास करीत आहाेत. वर्चस्वाच्या वादातून गाेळीबार झाला आहे. आराेपी आणि फिर्यादी एकमेकांना ओळखतात. दाेन गाेळ्या झाडण्यात आल्या असून कुणीही जखमी नाही. गाडीवर फायरिंग असल्यामुळे केवळ दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.
- राहुल मदने (पाेलिस उपायुक्त)