वर्धा पुन्हा तापले ४६.०४; दुपारी रस्ते ओस

* फळ, भाजीपाला, हार विक्रेत्यांना फटका

    दिनांक :18-May-2026
Total Views |
वर्धा,
wardha-heats : जिल्ह्याच्या तापमानात दररोज वाढ होत असून सोमवार १८ रोजी ४६.०४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन दुपारी रस्ते ओस पडले आहेत. गेल्या दोन दिवसात वर्धा देशात दुसर्‍या क्रमांकावर होते.
 
 
K
 
 
 
पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्याचे तापमान ४६.०६ अंश सेल्सिअसवर गेले होते. यानंतर तापमान किंचत कमी होऊन ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. तर मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीचा दिलासा मिळाला होता. परंतु, पुन्हा सूर्य तापायला लागल्याने जिवाची काहिली झाली. शनिवार, रविवारी जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. आज सोमवारी तापमानात वाढ होऊन ४६.०४ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली. वाढत्या तापमानाचा फटका फळ आणि भाजी विक्रेत्यांनासुद्धा बसला असून शहरात आज फुलेच विक्रीसाठी न आल्याने बहुतांश फुलांची दुकाने बंद होती. वाढत्या उन्हामुळे दुग्ध उत्पादनातसुद्धा घट झाल्याचे गोपालकांनी सांगितले.