काटोलजवळ ट्रक उलटून 3 मजुरांचा मृत्यू

    दिनांक :19-May-2026
Total Views |
काटोल,
3 laborers die near Katol खापा येथून सावनेरमार्गे मोवाडकडे विटा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकचा ईसापूर (झिल्पा) गावाजवळ भीषण अपघात झाला. मंगळवारी (दि. १९) घडलेल्या या दुर्घटनेत तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.एमएच २३ एयू ३२३५ क्रमांकाचा आयशर ट्रक विटा घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावरून घसरून पलटी झाला. या वेळी ट्रकमधील काही मजूर केबिनमध्ये झोपेत होते, त्यामुळे अपघाताचा मोठा फटका बसला.
 
 
 
die
या दुर्घटनेत संजय सुदामजी कनेरे (वय ४४), लीलाधर विष्णूजी वालूलकर (वय ४०) आणि अजित निळकंठ भलावी (वय ४०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर राजेंद्र राजगुरू, हेमराज लक्ष्मण कन्हेरे आणि सुभाष जयराम धुर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत व जखमी मोवाड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघातानंतर ट्रक चालक आणि मालक प्रवीण उर्फ गोलू बले हे घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी काटोल पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश उईके आणि अमोल वाघ करत आहेत.