चुकीने लाभ घेणाऱ्या बहिणींकडून वसुली!

आदिती तटकरे यांचा इशारा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
मुंबई,
Aditi Tatkare's Warning राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा अपात्र लाभ घेतलेल्या महिलांवर आता कारवाई होणार असून त्यांच्याकडून दिलेली रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी बोलताना स्पष्ट केले की, पात्र लाभार्थींना कोणत्याही परिस्थितीत योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करून रक्कम परत घेतली जाईल.
 
 
aditi
 
त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र काही महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. अशा सर्व प्रकरणांची सध्या तपासणी सुरू असून प्रत्येक विभागाकडून लाभार्थ्यांचा डेटा मागवण्यात आला आहे.यापूर्वी काही महिलांनी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. तसेच काही पुरुषांनीही या योजनेचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले आहे. अशा सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांकडून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काही अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या तक्रारीनंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्याचाही विचार सुरू आहे. ज्यांच्या नावावर वाहन नसतानाही आरटीओ डेटामध्ये चुकीची नोंद झाली असेल, त्यांनी योग्य पुरावे सादर केल्यानंतर तपासणी करून लाभ पुन्हा सुरू केला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.