योगेश वरभे,
अल्लीपूर,
first-class-veterinary-services : मागील एक वर्षापासून येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोबडे यांची दुसर्या जिल्ह्यात बदली झाल्यामुळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी ही जागा रित आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून तळेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी मंदार मराठे यांच्याकडे पीएम पोस्टमार्टम हीच कामं आहेत. कात्री येथील वैद्यकीय अधिकारी राजपूत यांच्याकडे अल्लीपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रभार असून राजपूत यांच्याकडे त्या व्यतिरित कानगावची जबाबदारी असल्याचे पशु पालकांची चांगलीच अडचण होत आहे. भर उन्हात जनावरांना आजार होत आहेत. परंतु, पशु वैद्यकीय अधिकारी येथे उपलब्ध होत नसल्याने पशु पालकांना आल्या पावली परत जावे लागते किंवा परिचारकांकडून आपल्या जनावरांवर उपचार करून घ्यावा लागतो. तीनही जागा भरून गोपालकांना सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

अल्लीपूर ते अल्लीपूर तालुयातील मोठे गाव असुन परिसरातील अनेके गावांचा भार अल्लीपूलवर आहे. येथील पशु वैद्यकीय दवाखाना रामभरोसे झाला आहे. पशुदया म्हणून की काय गेल्या वर्षभरापासून श्रीरामे परिचारक हेच पूर्ण पशुवैद्यकीयचा भार खांद्यावर घेऊन चालवीत होते. आता त्यांचीही पदोन्नती झाल्याने ते आरोग्यसेवक या पदावर शिरुड गेले आहेत. त्यामुळे त्यांचीही खुर्ची रिकामी आहे.
हिंगणघाट तालुयामध्ये जनावरांच्या शवविच्छेदनाची जबाबदारी तळेगाव येथील डॉ. मराठे यांच्याकडे असल्याने त्यांना हिंगणघाट तालुयातील सर्वच पशुंचे शवविच्छेदन करावे लागते. हिंगणघाट तालुयात पशु आरोग्य सेवा निट मिळत नसल्याने शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
अल्लीपूर येथील पशु वैद्यकीय रुग्णालय प्रथम श्रेणी दर्जाचा आहे. येथे पशुवैद्यकीय अधिकारी पट्टीबंधक व परिचारक अशा तीन जागा असून आज येथे एकही कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे येथील गोपालकांची मोठी पंचायत होत आहे. गोपालकांना खाजगी डॉटरकडून जनावरांच्या आरोग्याची काळजी पैसा देऊन करून घ्यावी लागते. औषधी सुद्धा विकत घेऊन जनावरांना द्यावे लागते. वर्धा पशुवैद्यकीय अधीक्षकांनी येथे नियमित अधिकारी, कर्मचार्यांची नियुती करावी अशी मागणी अल्लीपूूर व परिसरातील पशुपालकांनी केली आहे.