नागपूर,
Bhagavat Saptah Begins श्रीराम मंदिर, बजाजनगर येथे अधिक मासानिमित्त भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह १८ मे ते २४ मे या कालावधीत सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत होणार आहे. हरिभक्त पारायण साधना पांडे मुनिश्वर यांच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने काल सकाळी भागवत ग्रंथाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान बजाजनगरवासीयांनी औक्षण करून पवित्र ग्रंथाचे स्वागत केले. तसेच सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषेत कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
यावेळी अपर्णा वीरेंद्र अत्रे यांनी भागवत ग्रंथाची विधिवत पूजा करून संकल्प सोडला. कार्यक्रमास प्रफुल्ल माटेगावकर, खेर, राजेंद्र धाबे, खोंड, आरती देशपांडे, रेणुका मुदलियार, सुनिता पाठक, अपूर्वा माटेगावकर, गौरी ओक, शीतल सावजी, श्रुती खोंड, प्रियंका दुबे, सायली राजहंस यांच्यासह अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. Bhagavat Saptah Begins श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य: प्रतिमा माटेगावकर, संपर्क मित्र