वर्धा,
tiger-water-sports : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्र प्रमाणे बफर जंगल सफारीसाठी ढगा व रहाटी गेट पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. रहाटी गेटने प्रवेश करून जंगल सफारीचा आनंद लुटताना वाघीण व आखुड शेपटीच्या वाघाचे दर्शन पर्यटकांना होत नाही तोच ढगा गेटने एन्ट्री करून जंगल सफारीचा आनंद लुटणार्या पर्यटकांना कृत्रिक पानवठ्यावर वाघीण व तीन पिल्लांसह १८ रोजी जलक्रीडा करतानाचे दर्शन झाले. वाघ बघायला गेलेल्या पर्यटकांना खेळताना वाघोबा परिवार पहायला मिळाल्याने आनंद झाला. ते दृष्य पर्यटकांनी कॅमेराबद्धही केले.
तप्त उन्हामुळे जंगलातील बहुतांश जलस्रोत आटल्याचे वास्तव आहे. अशातच वन्यजीवांच्या तृष्णातृप्तीसाठी कृत्रिम पाणवठे उपयुक्त ठरत आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बांगडापूर बफर वनपरिक्षेत्रातील पाणवठ्यावर ए वाघीण व तिघे तीन पिल्लं निवांत पाण्यात खेळताना दिसुन आले. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ते पाण्यात विसावतात. शिवाय जलक्रीडाही करतात.