न्यायासाठी ७९ वर्षांच्या आजोबांचा राज्य माहिती व मानवी हक्क आयोगाकडे धाव घेण्याचा इशारा

    दिनांक :19-May-2026
Total Views |
हिंगणघाट, 
burkoni-gram-panchayat : तालुक्यातील बुरकोनी ग्रामपंचायतीमधील ५ वर्षांत मर्जीतील लोकांना वाटलेली बोगस मजुरी, आर्थिक अपहार तसेच वनविभागाच्या जागेतील बेकायदेशीर रस्त्यासाठी ७९ वर्षांचे आजोबा लढा देत आहेत. आज १९ रोजी पंचायत समितीत झालेल्या प्रथम अपील सुनावणीत वरिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती देण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मुख्य अर्जदार शंकर आष्टनकर (७९) यांनी केला आहे.
 
 
L
 
 
 
आता राज्य माहिती आयोग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेण्यार असल्याचे त्यांनी सांगितले. आज दुपारी २ वाजताचे सुमारास झालेल्या सुनावणीत अर्जदाराचे कायदेशीर प्रतिनिधी भूषण आष्टनकर यांनी ५ वर्षांचे अधिकृत बँक स्टेटमेंट आणि ग्रामपंचायतीचे कॅश बुक अधिकार्‍यांसमोर सादर केले. ६ लोकांच्या नावे नाली सफाईची खोटी बिले काढल्याचे आणि लाखो रुपयांची शासकीय रोकड शिपायाच्या ताब्यात बेकायदेशीरपणे ठेवल्याचे तांत्रिक पुराव्यांसह सिद्ध करण्यात आले. वनविभागाच्या अधिकृत मोजणीत हा प्रकार सिद्ध झाला असून ५ दिवसांत त्याचा अंतिम अहवाल येणार आहे. सुनावणी दरम्यान वरिष्ठ अधिकार्‍यांनी ग्रामसेवकाला सर्व माहिती विनामूल्य व प्रमाणित प्रतिसह देण्याचे आदेश दिले तसेच भ्रष्टाचारावर स्वतंत्र तक्रार आल्यास कारवाई करू असे सांगितले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठ येथे द्वितीय अपील दाखल करण्याचे ठरविले असल्याची माहिती आहे.