अनैतिक संबंधामुळे पत्नीच्या प्रियकराचा केला खून?

- अजय श्रीवास हत्याकांडात दाेघांना अटक

    दिनांक :19-May-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
murder पत्नीचा वर्गमित्र असलेल्या अजय श्रीवास याच्यासाेबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे संतप्त झालेल्या पतीने घरात घुसून अजयचा खून केला. या हत्याकांडात पाेलिसांनी दाेघांना अटक केली. उमंग (44) आणि त्याचा साथीदार संदेश भाेसले (31) अशी आराेपींची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेने साेमवारी गणेशपेठ परिसरातून दाेन आराेपींना अटक केली.
 
 
murder
 
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमंग हा गणेशपेठ परिसरातील पहाडवाले माता मंदिराजवळ राहणारा ‘वसंत डेअरी’चा संमालक आहे. अजय किशाेरीलाल श्रीवास (40) हा गिट्टीखदानमधील गाेरखेडे काॅम्प्लेक्स येथे भाड्याच्या घरात राहत हाेता आणि एका बँकसाठी लाेन एजंट म्हणून काम करत हाेता. शनिवारी दुपारी 3 ते 3.30 वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह घरात रक्ताच्या थाराेळ्यात आढळून आला हाेता. पाेलिस तपासात समाेर आलेल्या माहितीनुसार, आराेपी उमंग याला पत्नी आणि अजय श्रीवास यांच्यातील सततच्या फोनवरील संभाषणाबाबत संशय हाेता. दाेघे बालपणीचे मित्र असून अनेक वर्षांपासून त्यांच्यात नियमित संपर्क हाेते. यादरम्यान दाेघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दाेघेही तासनतास फोनवर बाेलत हाेते तसेच ते िफरायला साेबत जात हाेते. ही बाब पती उमंगला खटकत हाेती. उमंग हा वारंवार पत्नीशी आणि अजयशी वाद घालत हाेता. अजयचे पत्नीशी असलेले अनैतिक संबंध उमंगला पटत नव्हते. त्यामुळे त्याने अजयची ‘गेम’ करण्याचा कट रचला.
 
दरम्यान, गेल्या वर्षी पत्नी गुप्तपणे दाेन अतिरिक्त सिमकार्ड वापरत असल्याचे उमंगच्या लक्षात आल्यानंतर घरातील तणाव अधिक वाढला.murder 29 एप्रिल राेजी मुलाच्या वाढदिवसादरम्यान झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी निघून गेली हाेती. यानंतर तिच्याकडून गणेशपेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. काही दिवसांतच उमंगला घटस्फोटाची नाेटीस मिळाली. याच कारणामुळे उमंगचा राग अधिक तीव्र झाला.
मित्राच्या मदतीने केला खून
उमंगने साथीदार संदेश भाेसलेसाेबत मिळून अजय श्रीवासच्या हत्येचा कट रचला. आराेपींनी श्रीवासच्या हालचालींवर पाळत ठेवली. त्याचा पाठलाग करून त्याचे राहते घर शाेधून काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आराेपींनी अनेकदा कारमधून टेहळणी केली. शनिवारी दुपारी त्यांनी अजयच्या घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने भाेसकून त्याचा खून केला. दाेन्ही आराेपींना गुन्हे शाखेने अटक केली.