साकोली,
burned to death शेतातील मक्याच्या पिकाला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास घडली असून, रामदास गोखलू निंबेकर (रा. तलाव वॉर्ड, साकोली) असे मृत वृद्धाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रामदास निंबेकर यांच्या शेतातील मका पिकाला अचानक आग लागली.
आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शेताला आग लागल्याचे दिसताच निंबेकर ती विझवण्यासाठी धावले, मात्र आगीच्या तीव्र ज्वाळांमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.burned to death पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे करत आहेत.