शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जपण्याची गरज

- मकरंद अनासपुरे यांनी जलक्रांती परिषदेत व्यक्त केल्या भावना

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नागपूर,
Makrand Anaspure एका बियाण्यातून हजाराे दाणे निर्माण करण्याची किमया शेतकरी साकारताे. त्यामुळेच आपण त्याला अन्नदाता म्हणताे. मात्र, व्यवस्थेने आजवर त्याला खऱ्या अर्थाने व्यावसायिक हाेऊ दिले नाही. उलट शाेषणाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जपणे अत्यावश्यक असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते आणि ‘नाम फाउंडेशन’चे सचिव मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.
 
Makrand Anaspure
 
 
 
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या राैप्य महाेत्सवानिमित्त रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित ‘जलक्रांती परिषद 2026’मध्ये ते विशेष अतिथी म्हणून बाेलत हाेते. नापिकीग्रस्त शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. या माध्यमातून विदर्भासह जम्मू-काश्मीर, लेह-लडाख, केरळ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि आसामपर्यंत विविध मदतकार्य पाेहाेचल्याची माहिती त्यांनी दिली. ‘ही माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ आहे. शेतकऱ्यांना आधार आणि सन्मान मिळवून देणे हा नाम फाउंडेशनचा प्रमुख उद्देश आहे’, असे ते म्हणाले. पाण्यामुळे गावाचे अर्थकारण बदलते, त्यामुळे शेतीला पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असली पाहिजे. तसेच शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी जाऊन उपाय शाेधल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निसर्गाचा विचार केला नाही तर...
शहरांतील विकासकामांवर भाष्य करताना अनासपुरे म्हणाले, विकासासाेबत निर्माण हाेणाèया समस्यांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शिक्षणामुळे लयास जात असलेली श्रमप्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे. शिक्षणातून वाढणारे परावलंबित्व ही देखील समाजासमाेरील माेठी समस्या आहे.Makrand Anaspure विकासाच्या नावाखाली हाेणाऱ्या वृक्षताेडीमुळे एक संस्कृतीच नष्ट हाेत असल्याची खंत व्यक्त करीत, आज आपण निसर्गाचा विचार केला नाही, तर उद्या निसर्गही आपला विचार करणार नाही. त्यामुळे पर्यावरण, शेती आणि समाजव्यवस्थेकडे डाेळसपणे पाहण्याची आवश्यकता त्यांनी अधाेरेखित केली.