वैशालीनगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नागपूर,
Vaishalinagar लिट फाउंडेशनच्या वतीने वर्ल्ड हायपरटेन्शन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, वैशालीनगर येथे मोफत बी.पी. व शुगर तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे १५० नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
nagpue
 
या उपक्रमास तांदळे गुरुजी रिसोर्स अँड डेव्हलपमेंट सोसायटी तसेच सुजाता बुद्ध विहार कमिटी यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विनय वाघमारे, मंजुषा वाघमारे, आकाश खोब्रागडे, दिलीप तांदळे, अशोक रामटेके, राजेश रामटेके, प्रीती गभिजे आणि धनमाला गोंडाने यांनी विशेष परिश्रम घेतले. Vaishalinagar कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व सहकार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र